Wednesday, March 11, 2026
spot_imgspot_img
spot_img

संजय राऊत, उबाठा गट सातत्याने षंढाच्या भूमिकेत भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई :-  संजय राऊत, उबाठा गट हे सातत्याने षंढाच्या भूमिकेत वावरत आहेत. राऊत हे षंढ असून त्यांना, शांततेचा अधिकार षंढांना नसतो तर सामर्थ्यशाली शूरवीरांना असतो याचा विसर पडलेला आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारताचा आणि महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास होत असल्यामुळे विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मतदारांच्या आशीर्वादाने बलशाली कोण आहे आणि षंढ कोण आहे हे सिद्ध झाले आहे अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

यावेळी बन म्हणाले की, अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात संजय राऊतांनी प्रसिद्धीसाठी खोटेनाटे आरोप करणे त्वरित थांबवावे. काही ठोस पुरावे असतील तर ते संबंधित तपास यंत्रणांना द्यावे. फुटकळ पत्रकार परिषदांमधून बिनबुडाचे आरोप करणे त्वरित थांबवावे. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न युद्धस्तरावर सीआयडी मार्फत केले जात आहेत. व्हीएसआर कंपनी असो वा त्या कंपनीचा मालक असो तपासाअंती दोषींवर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करण्यास सुनेत्रा पवार सक्षम असून सदसदविवेकबुद्धी ने त्या निर्णय घेतील. सुनेत्राताईंना सल्ले देण्याची गरज नाही असेही त्यांनी खडसावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील आजचा नव भारत कोणालाही घाबरत नाही असे बन म्हणाले. राहुल गांधींना राऊत, उद्धव ठाकरे आणि उबाठा गट घाबरतात म्हणूनच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा सोडत उबाठा गट काँग्रेस ,सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या चरणी गुलाम झालेले आहेत. राहुल गांधींच्या पाठीशी जनता कधीच नव्हती, राहुल गांधी यांच्या कडे ठोस पुरावे कधीच नसतात, त्यांना केवळ कॉमेडी शो करायचा असतो असा टोमणा ही त्यांनी मारला.

मोदींच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवर भारत सर्वात सुरक्षित देश 

आखाती देशांतील युद्ध स्थितीत त्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप भारतात आणण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार करत आहे. मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत देश आणि भारतीय जगाच्या पाठीवर सर्वात सुरक्षित आहेत. तेव्हा देशाच्या सुरक्षिततेबाबत काळजी स्वत: काँग्रेसचे गुलाम असणा-या राऊतांनी करू नये अशी सणसणीत चपराक श्री. बन यांनी लगावली. गुलाम घाबरतात योद्ध्यांनी घाबरायचे नसते. हा देश योद्ध्यांचा, वीरांचा, सामर्थ्यशाली मोदींच्या नेतृत्वातील आहे याचा राऊतांना विसर पडलेला दिसतो अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com