spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सरदार@150 युनिटी मार्च विकसित भारत पदयात्रा आयोजन

यवतमाळ :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या “मेरा युवा भारत” (MY Bharat) या उपक्रमाअंतर्गत “सरदार@150 युनिटी मार्च – विकसित भारत पदयात्रा” चे आयोजन संपूर्ण देशभरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातही करण्यात आले आहे.

ही पदयात्रा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त समर्पित असून, तिचा उद्देश युवकांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सामाजिक जबाबदारी आणि एकतेची भावना बळकट करणे हा आहे. ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “लोकसहभागातून राष्ट्र उभारणी” या दृष्टिकोनातून प्रेरित आहे.

कार्यक्रमाचे महत्त्व व उद्दिष्ट या ऐतिहासिक मोहिमेतून युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग अपेक्षित असून, “एक भारत – आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जात आहे. “अमृत पिढी” अर्थात आजच्या तरुणांची भुमिका केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे.

डिजिटल टप्प्याची सुरुवात ६ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते माय भारत पोर्टलवर या मोहिमेची डिजिटल सुरुवात करण्यात आली. या टप्प्यात सोशल मिडिया रील स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा “सरदार@150 यंग लीडर्स” प्रोग्राम यांचा समावेश आहे. या प्रोग्राममधील १५० विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

मोहिमेचे दोन प्रमुख टप्पे जिल्हास्तरीय पदयात्रा ३१ ऑक्टोबर -२५ नोव्हेंबर २०२५ प्रत्येक संसदीय मतदारसंघातील जिल्ह्यात ८-१० कि.मी.चा ३ दिवसांचा पायी मार्च आयोजित केला जाईल. शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, वादविवाद, पथनाट्य, चर्चासत्रे, तसेच “ड्रग्ज मुक्त भारत” प्रतिज्ञा घेण्यात येतील. “गर्वाने स्वदेशी” संकल्प तसेच योग शिबिरे, आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहिमा आयोजित होतील. सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आदरांजली, आत्मनिर्भर भारताची शपथ व प्रमाणपत्र वितरण होईल. राज्याचे मंत्री, खासदार, प्रशासकीय अधिकारी व “माय भारत” प्रतिनिधी मोर्चाचे नेतृत्व करतील.

राष्ट्रीय पदयात्रा २६ नोव्हेंबर -६ डिसेंबर २०२५ करमसद (गुजरात) येथून सरदार पटेल यांच्या जन्मस्थळापासून “स्टॅच्यू ऑफ युनिटी” (केवडिया) पर्यंत १५२ कि.मी. पदयात्रा. मार्गातील गावांमध्ये सामाजिक उपक्रम, युवा सहभाग, विविध सांस्कृतिक उत्सव, व “सरदार गाथा” (प्रत्येक संध्याकाळी) यांचे आयोजन. १५० ठिकाणी सरदार पटेल यांचे जीवन व कार्य यावरील प्रदर्शने होणार.

नोंदणी प्रक्रिया: सर्व स्पर्धा, उपक्रम आणि पदयात्रेत सहभागी होण्यासाठी मेरा युवा भारत पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे: https://mybharat.gov.in/pages/unity_march मेरा युवा भारत, यवतमाळ कार्यालयाचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम आणि अनिल ढेंगे यांनी जिल्ह्यातील युवकांना या ऐतिहासिक पदयात्रेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

Popular Articles