– गोंडवाना गणतंत्र पार्टी च्यावतीने आंदोलनाद्वारे एकून सतरा मागण्यांचे दिले निवेदन
नागपूर :- गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने 23 सप्टेंबर रोजी संविधान चौकात प्रदेशाध्यक्ष हरीष उईके यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात आली. अनुसूचित जमातीमध्ये गैर आदिवासी घुसखोरी करत आहेत. जे आदिवासींच्या आरक्षण लादण्याच्या प्रयत्न करत आहे. आजही बंजारा समाज व धनगर समाज गैर आदिवासी समाज हे आदिवासीच्या आरक्षण हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासी समाज बांधव आपल्या हक्कासाठी, हितचिंतक समाजसेवी, संघटना या एक दिवसीय आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात प्रमुख मागण्यांसाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण बंजारा व धनगर समाजाला देण्यात येऊ नये. आंदोलनाद्वारे एकून सतरा मागण्यांचे निवेदन दिले. भाषिक व क्षेत्रीय आधारावर गोंडवाना राज्याची निर्मिती करण्यात यावी ही सुद्धा मागणी आहे. .बरेसश्या काही मागणी आहेत. आदिवासींच्या वेदना व मागण्यांची पूर्तता करावी अशी कळकळीची विनंती आदिवासी बांधवांनी केली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल आणि आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदने देण्यात आली. निवेदन देतेवेळी हरीष उईके, सुधाकर परतेकी, राजेश इरपाते, आणि दिनेश सिडाम या सर्वांची उपस्थिती होती.

