Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

शालेय उपक्रम : बाल महोत्सव बक्षीस वितरण समारंभ

– एकूण ४६८ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- नुकतेच रोज शुक्रवारला कला, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सव समर्थ प्राथमिक शाळा रामटेक येथे आयोजित करण्यात आला होता. त्यातील विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर, प्रमुख अतिथी म्हणून सचिव ऋषिकेश किंमतकर, मीनाक्षी प्रसाद किंमतकर , रुद्रांश प्रसाद किंमतकर, नगरपरिषदचे सभापती सुमित कोठारी, पालक समिती सदस्य आकाश ढोबळे, पंकज बावनकर (पत्रकार तथा पालक समिती सभासद ) समर्थ कॉन्व्हेंटच्या प्राचार्य घोष, मिडलस्कूल विभाग प्रमुख विद्या किंमतकर समर्थ प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कविता जौंजाळ आदिसह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष स्व. मधुकररावजी किंमतकर व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तथा शारदा स्तवन घेऊन करण्यात आले. यावेळी एकूण ४६८ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.दरम्यान महिला दिन सप्ताह निमित्य प्राथमिक विभागातील सर्व महिला शिक्षिकांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कविता जौजांळ यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक रवी मथुरे यांनी तर आभार प्रियंका चोरे यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com