– नागरिकांना बुंदी वाटप
नागपुर :- रयतेचे राजे, कूलवाडी कुलभूषण, सामाजिक एकतेचे पुरस्कर्ते छञपती शिवाजी महाराज यांची जयंती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती, उंटखाना नागपूर तर्फे साजरी करण्यात आली. याप्रसंगी संजय मेश्राम, भगवान भगत, राजेंद्र ढोले यांनी माल्यार्पण करून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संघपाल गाणार, राजेंद्र साठे, संजय आंभोरे, विजय सातपुते, अजय धाबर्डे, अंनता रामटेके तुषार दुर्योधन, प्रशांत सोनडवले, सुरेश रामटेके, आनंद देशमुख, सहदेव भगत, मिलिंद वराडे, अविनाश मून, संजय दमके आदी नागरीक उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांना बूंदी वाटप करण्यात आली.