◼️राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन
सचिन चौरसिया, रामटेक :- रामटेक गडमंदिर परिसरातील भक्तांसाठी गडमंदिर येथील “सीतामाता रसोई ” पुन्हा सुरू करण्यात येत आहे. (दि.१७) मे ला सकाळी १० वाजता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी गडमंदिराचे रिसिवर तथा उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन सहित अनेक मान्यवर उपस्थित राहतील. सीतामाता रसोई घर सेवा संस्थान व रामटेक परिसरातील नागरिक व रामभक्त स्वयंसेवक यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक शनिवार व रविवरला निशुल्क महाप्रसाद देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे भाविकांना महाप्रसादाची निशुल्क सुविधा उपलब्ध होणार आहे.