Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

नागपूर :- साई महिला जागर संस्था, नागपूर यांच्या वतीने संचालित श्री साई स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून आयोजित विदर्भस्थरीय महिला कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज नंदनवन येथील नागपूर महानगरपालिका उर्दू शाळा मैदान, वुमन्स कॉलेजसमोरील गर्भा ग्राउंड येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे आयोजन अलका ठेंगरे व अनिता रेड्डी यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

या उद्घाटन सोहळ्याला आमदार कृष्णा खोपडे, सविता मोहन मते, उपमहापौर लीला हातीबेड, गणेश चर्लेवार मनपा गटनेते शिवसेना नगरसेविका दिव्या धुरडे, मंगला खेखरे, ज्योती देवघरे, तसेच नगरसेवक निलेश गायधणे, विलास पाटील, क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर आणि सरिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर पहिल्या दोन सामन्यांना सुरुवात करून स्पर्धेचा श्रीगणेशा करण्यात आला. पहिला सामना रवींद्र उमरेड विरुद्ध विक्रांत नागपूर यांच्यात रंगला, तर दुसरा सामना विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ नागपूर आणि मराठा लॉन्सर्स नागपूर यांच्यात खेळविण्यात आला.

यावेळी उपस्थित आमदार कृष्णा खोपडे व इतर मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पुढील काळातही अशा प्रकारचे क्रीडा उपक्रम सातत्याने राबविले जावेत, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सर्व खेळाडूंशी भेट घेत त्यांचा परिचय करून घेतला तसेच त्यांना उत्तम खेळासाठी प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमुळे महिला कबड्डी खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याची चांगली संधी मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com