किशोर साहू, मौदा, ता. १:- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय नागपूर व कृषी संशोधन केंद्र तारसा येथील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (आरएएमडब्ल्यूई) कार्यक्रमांतर्गत श्री. साईबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निमखेडा येथे विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


डॉ.पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व, आरोग्य विषयीची माहिती मासिक पाळी दरम्यान काळजी घेण्याचे मार्ग आणि चांगला व वाईट स्पर्श ओळखण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच इंटरनेट आणि सोशल मीडियाचा योग्य वापर समजावून सांगितला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आकाश निनावे प्रमुख पाहुणे हेमलता मरसकोल्हे , ज्योती गजभिये तर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय नागपूर तर्फे सहभागी विद्यार्थिनी सृष्टी राणे, रोशनी त्रिकुळ, अश्लेषा मस्के, गुंजन उमाठे, प्रेरणा वानखेडे, कार्तिका निमजे, साक्षी शर्मा या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमात शिक्षकवृंद ईश्वर पत्रे, रवींद्र गोयले, मंगेश बोरकर, आशिष आरीकर ,उमेश वैद्य शुभम झाडे उपस्थित होते.




