spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बडेगाव परिसरातील बौद्ध विहारांना सुरई ससाई ने दिली सदिच्छा भेट,रॅलीला केले संबोधित

– जनजागृती संविधान की’ लघुनाट्याने केले जनतेला जागरूक

खापा, वार्ताहर :- बडेगाव (ता. सावनेर) परिसरात येणारे धम्मगिरी, चारगाव, बडेगाव क्षेत्रातील प्रज्ञाशिल बौद्ध विहार, धम्मगिरी बौद्ध विहार येथे पूजा अर्चना करून धम्म सेना नायक भंते आर्य नागार्जुन सूरई ससाई यांनी रॅलीला संबंधित केले.

प्रज्ञाशील बौद्ध विहार बडेगाव येथे सकाळी अकरा वाजता बुद्ध वंदना करून रॅली काढण्यात आली. बडेगाव येथील हेटी चौकातील भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून रॅली धम्मागिरी टेकडी येथे पोहचून बुद्ध वंदना करण्यात आली. नंतर सांची स्तुप गेटला भेट दिली. यानिमित्ताने दि बुद्धिष्ट गोल्डन ईरा वूमेन्स फाऊंडेशनद्वारे लघु नाटिका ‘जनजागृती संविधान की’ प्रस्तुत करून नागरिकांना संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्म सेना नायक भदंत आर्य नागार्जुन सूरई ससाई बोधगया महाविहार मुक्ती आंदोलन आंदोलनाचे प्रेरक उपस्थित होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून भदन्त नागसेन, भदन्त धम्मविजय, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त प्रज्ञाबोधी, भदन्त महानाग, भदन्त बोधीधम्म, भिक्षु संघ उपस्थित होते.

सदर आयोजनाकरिता ग्लोबल वेलफेअर असोशिएशन, नागपूर, भारतीय बौद्ध महासभा, धम्मगिरी विकास समिती, बडेगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती, बडेगाव, बुद्धा टूर्स ॲन्ड ट्रॅव्हलस, नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक वाचनालय, चारगाव, रमाई बहुउद्देशीय महीला मंडळ, चारगाव, रोहरा मिनरल प्रायव्हेट लिमिटेड, चारगाव, अभया वुमेन इंटरप्रेनर्स असोशिएशन, नागपूर, संयोजक रिता अधिर बागडे यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अधिर बागडे, निर्भय बागडे, सिध्दार्थ शेंडे, अश्विन बागडे, पंकज बागडे, महेंद्र (गोलु) सोमकुवर, परिपाल बागडे, मयुर नागदवने, सुदर्शन गजभिये, माया बागडे, रत्नमाला गजभिये, सुजाता रंगारी, रिना बागडे यांच्यासह सर्व समाजबांधवांनी सहभागी होऊन सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.