spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घटनेत सत्यता आढळल्यास ‘ कारवाई करा ‘ जिल्ह्यातील पत्रकारांची एस.पी. दालनात बैठक

पत्रकाराला जिवे मारण्याची धमकीचे प्रकरण

रामटेक १३  :-  व्हाईस ऑफ मिडीया संघटनेच्या रामटेक शाखेचे सदस्य सुरेंद्र बालचंद बिरणवार यांना गैरअर्जदाराकडून तुम्ही वर्तमानपत्रात बातमी का बरं छापली व त्यामुळे आमची बदनामी झाली म्हणून गैरअर्जदाराकडून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. याबाबद पत्रकार बिरणवार यांनी रितसर रामटेक पोलीस स्टेशनला तक्रार दिली मात्र रामटेक पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली नाही. दरम्यान जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांचे नेतृत्वात मंगळवार (दि. १२) ऑगस्ट नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली असता त्यांनी ‘ घटनेची चौकशी करा व सत्यता आढळल्यास ॲक्शन घ्या ‘ असे लेखी आदेश रामटेक पोलीस निरीक्षकला दिले. आता स्थानीक पोलीस प्रशाषणाचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पोलिस ठाणे हद्दीतील नगरधन येथील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या रामटेक शाखेचे सदस्य सुरेंद्र बालचंद बिरणवार यांनी ३ ऑगस्ट रोजी एक बातमी छापली. ही बातमी छापल्यामुळे आमची बदनामी झाली, असे म्हणत श्याम वाघमारे, रा. नगरधन व नीलेश वाघमारे, रा. हमलापुरी, ता. रामटेक यांच्याकडून वारंवार त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे पत्रकार बिरणवार यांनी रामटेक पोलिस स्टेशनला १० ऑगस्टला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा गंभीर प्रकारचा गुन्हा असूनही पोलसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. दरम्यान यासंदर्भा (दि.१२) पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्यासोबत एक बैठक घेण्यात आली होती. अजूनपर्यंत गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली नाही तसेच पत्रकार संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३ नुसार कोणत्याही गंभीर गुन्हाची नोंद केली नाही. भविष्यात पत्रकारांबाबद अशा प्रकारचे कृत्य कोणी करणार नाही अशी कारवाई केली गेली पाहिजे अशी पत्रकारांची रास्त मागणी आहे

Popular Articles