नागपूरात उद्या वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांची १९४ वी जयंती होणार उत्साहात

0
68

 

नागपूर १६ : वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा आज , १६ ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे. हा सोहळा राजस्थानी ब्रह्म समाज भवन, प्रीतम कॉम्प्लेक्सजवळ, स्मॉल फॅक्टरी एरिया, भंडारा रोड, नागपूर येथे पार पडणार आहे.

युवा कोशाध्यक्ष आकाश बहेटवार यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजातील अनेक साथीदार यांच्या सहकार्याने जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या भोजलिया शोभायात्रेत ४ ते ५ शेकडो नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.”

या कार्यक्रमात समाजातील १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सील्ड व गुलदस्त्याने सन्मान करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

जयंतीच्या तयारीसाठी समाजाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला मंडळ व युवा साथीदार मागील एक महिन्यापासून तयारीत गुंतले असून, समाज एकतेचा परिचय या सोहळ्यातून दिसून येणार आहे.