spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागरिकांचा आशीर्वाद हाच आधार—काँग्रेस एकटीच १०० नगरसेवकांसाठी रणसज्ज

नागपूर :- नागपूर महानगरपालिका निवडणूक–२०२६ साठी काँग्रेस पक्षाने सर्व १५१ प्रभागांत उमेदवार उभे केले असून, नागरिकांच्या आशीर्वादाने १०० नगरसेवक निवडून आणण्याचे ठाम लक्ष्य निश्चित केले आहे. गेल्या १९ वर्षांतील भाजपच्या अपयशी, भ्रष्ट आणि जनविरोधी कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांना बदल हवा आहे, आणि तो बदल केवळ काँग्रेसच देऊ शकते, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, कोविड-१९ महामारीसारख्या कठीण काळात प्राणांची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीला धावून गेलेले, रुग्ण, नातेवाईक, गरीब व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्यरत राहिलेले आणि संपूर्ण राजकीय आयुष्यात आपल्या प्रभागातील हर एक घटकासाठी झटणारे तळागाळातील कार्यकर्ते यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

“हे उमेदवार केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर वर्षानुवर्षे नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी राहिलेले आहेत. त्यामुळे नागपूरकर नक्कीच त्यांना भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्या प्रभागाची जबाबदारी त्यांच्या हाती नगरसेवक म्हणून सोपवतील,” असे ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या १९ वर्षांच्या अपयशामुळे मूलभूत सुविधा कोलमडल्या, शहराचा विकास खुंटला आणि नागपूरकरांचा विश्वास तुटला. याउलट काँग्रेस स्वच्छ, स्मार्ट, समावेशी आणि जनहितकारी नागपूर घडवण्यासाठी ठोस आराखड्यासह निवडणुकीला सामोरी जात आहे.

नागरिकांचा वाढता प्रतिसाद, उत्स्फूर्त पाठिंबा आणि बदलाची तीव्र इच्छा पाहता, काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने, एकजुटीने आणि आत्मविश्वासाने या निवडणुकीत उतरले असून नागपूरमध्ये परिवर्तन निश्चित आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Popular Articles