spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रायवाडी शिवारात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीतील रायवाडी येथील शिवारातील नाल्याजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवार दि. १५ मे रोजी सायंकाळी पाच, सहा वाजता दरम्यान उघडकीस आली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लताबाई आनंदराव निरगुळे (वय ७० वर्ष) असे मृतक वृद्ध महिलेचे नाव असून रा. सावंगा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे.

प्रथम निदर्शनावरून घटनास्थळावर असलेल्या नालीवरून जात असताना वृद्ध महिलेचा पाय घसरला असावा आणि ती त्या नाली मध्ये पडली असावी. त्यातच उन्हाची तीव्रता जास्त असल्याने, पाणी न मिळाल्याने आणि त्वरित उपचार न मिळाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती स्थानिक लोकांनी खापा पोलिसांनी दिली. माहिती मिळताच खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणी करण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचरण करण्यात आले. फॉरेन्सिक टीमने पंचनामा व आवश्यक तपासणी केली. वृद्ध महिले जवळ असलेल्या आधार कार्डच्या मदतीने नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटविण्यात यश आले.

सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड व हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीम मेंबरच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून यांच्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालय सावनेर येथे दाखल करण्यात आले. तेथून पुढील तपासणी व नेमका मृत्यू कशाने झाला यासाठी मेडिकल हॉस्पीटल नागपूर येथे हलविण्यात आले.

प्राथमिक तपास ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात विशाल महालकर आणि पोलिसांनी केला. पुढील तपास खापा पोलीस करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.