spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहराच्या जडणघडणीसाठी ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य आवश्यक 

– अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांचे प्रतिपादन

– मनपातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

नागपूर :- नागपूर शहराच्या जडणघडणीत साक्षीदार राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सूचना तसेच त्यांचे सहकार्य आवश्यक असून,त्यांच्या सकारात्मक सूचनांवर निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी आज बुधवारी (ता. १) केले.

नागपूर महानगरपालिकेचा ज्येष्ठ नागरिक कक्ष आणि सिनिअर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून झाले. यावेळी उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावनकर, मनपाच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे सचिव व समन्वयक  सुरेश रेवतकर, महराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक सल्लागार समितीचे माजी सदस्य हुकुमचंद मिश्रीकोटकर, सिनिअर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट अध्यक्ष मनोहरराव खर्चे, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्यक्ष प्रभूजी देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्व समावेशक भविष्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या आवाजाला सक्षम बनविणे ही यावर्षी ज्येष्ठ नागरिक दिनाची संकल्पना आहे. यावेळी बोलताना वैष्णवी बी. यांनी नागपूर शहराच्या अमृत महोत्सवी वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम नागपूर महानगरपालिका राबवित असल्याचे सांगितले. नागपूर शहराची जडणघडण आपण पाहिली आहे. त्यामुळे शहराचा भविष्यात विकास कसा व्हावा, यासंदर्भात निश्चितपणे आपल्या काही कल्पना असतील. यासाठी आपण महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन सूचना देऊ शकता. महापालिकेतर्फे संचालित होणाऱ्या विविध योजनांची माहिती महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. ज्येष्ठ नागरिक असले तरी विचाराने अजूनही तरूण असल्याने सूचना महानगरपालिकेसाठी निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्या सूचनांचे स्वागत करू, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्य केलेल्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही जणांचा यावेळी वैष्णवी बी. यांच्या हस्ते तुळशीचे रोपटे व महापालिकेच्या मानाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. यात सुरेश रेवतकर, महाराषट्र राज्य ज्येषठ नागरिक सल्लागार समितीचे माजी सदस्य हुकुमचंद मिश्रीकोटर सिनिअर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्यक्ष प्रभू देशपांडे, अविनाश तेलंग,तुलशीदेवी गांधी, मदनमोहन डागा, नामदेवराव फटिंग, अँड. अजय घारे, दीपक शेंडेकर यांचा समावेश होता.

विशेष आरोग्य शिबीर

कार्यक्रमापूर्वी मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबीर घेण्यात आले.

 बाकी शून्य नाटकाचा प्रयोग

या कार्यक्रमानंतर यावेळी शेतकऱ्यांच्या जीवनावर रमेश थोरात यांनी पथनाट्य सादर केले. तसेच संजय भाकरे फाऊंडेशन निर्मित बाकी शून्य या ज्येष्ठ नागरिकांच्या वेदनांवर प्रकाश टाकणारे नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार ज्येष्ठ नागरिक कक्षाचे सचिव सुरेश रेवतकर यांनी मानले.

Popular Articles