कामठी :- 25 मे पासून सुरू झालेल्या नवतपाने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही केली त्यातच काल सायंकाळी 5 दरम्यान झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या पावसाने कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागाला चांगलेच झोडपले. ज्यामध्ये कामठी तालुक्यातील उमरी गावातील भोजराज परतेकी नामक इसमाचा जख्मि होऊन मृत्यू झाला. तसेच शैलेश वंजारी यांच्या मालकीचा एक बैल झाडाखाली मृत्युमुखी पडला. तसेच सावळी गावातील बऱ्याच घरावरच्या छतावरचे टिनाचे पत्रे उडाले.










