spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तारसा येथे भव्य तीन दिवसीय मंडईची आम दंगलीने सुरुवात थाटात, आज रात्री लावणी उद्या खडी गंमत 

किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदा 80 व्या वर्षी सुद्धा श्री शिवाजी व्यायाम शाळा तारसा( र. नं. 239/11) येथे आमदंगल व भव्य मंडई मेला चे आयोजन गुरुवार ( दि.27 नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता पासून आमदंगलने थाटात करण्यात आली असून आमदंगलच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाला तालुका व जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रा.पं. तारसा माजी सरपंच आनंद लेंडे, शेषराव देशमुख, गट ग्रा.पं. गांगनेर (हिवरा) उपसरपंच मोतीराम घरजाळे प्रामुख्याने उपस्थित होते. रात्रीला दोन वेगवेगळ्या स्थानी नऊ अंकी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.आज शुक्रवार ( दि. 28 नोव्हेंबर) ला तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शाहिरांमार्फत दिवसभर खडी गमतीचे आयोजन करण्यात आले. रात्री आठ वाजता पासून तारसा येथील बस स्थानक परिसरात सैराट न्यू कोल्हापुरी लावणी वडसा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या शनिवार( दि. 29 नोव्हेंबर)ला सकाळी दहा वाजता पासून तारसा जॉईंट येथे जयताळा नागपूर येथील कलंगी पार्टीचे शाहीर मोरेश्वर यांच्या खडी गमतीचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीचे अध्यक्ष मोतीराम सोमनाथे, उपाध्यक्ष यशवंत डांगरे, सचिव रोशन अहिरकर, सहसचिव शेखर डांगरे, कोषाध्यक्ष अमित डोकरीमारे, सह कोषाध्यक्ष कमलाकर धावडे, सदस्यगण शुभम गभणे ,सिकंदर वैद्य, अक्षय ढोबळे, आदित्य राऊत ,नितेश देशमुख ,इंद्रपाल येळणे ,हरीश ढोबळे, लीलाधर देशमुख, सचिन लोहबरे, शेखर हारोडे परिश्रम घेत असून समस्त ग्रामस्थ सहकार्य करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.