spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शासकीय रुग्णालयातील खोकल्याच्या औषधी कालबाह्य नाहीत

Ø रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट

– समाजमाध्यमांवरील बातमी दिशाभूल करणारी

यवतमाळ :- यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात खोकल्याच्या औषधी कालबाह्य नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आले.

बॅच नंबर व मुदत कालावधी मिटलेली खोकल्याची औषधी वितरीत केल्याबाबत समाज माध्यमातील चुकीच्या व्हायरल बातमीच्या अनुषंगाने शासकीय रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण केले असून त्यानुसार खोकल्याची औषधी मे. हाफकिन महामंडळ, मुंबई यांचेकडून शासकीय रुग्णालयास एप्रिल २०२५ मध्ये पुरवठा झालेला आहे. पुरवठा घेतांना बॅच नंबर व मुदत कालावधी तपासूनच व पुराव्यादाखल त्याचे छायाचित्र जतन करुन ठेवण्यात आलेले आहेत. तसेच त्याची विभागांतर्गत पार्सल रजिस्टर व जडसंग्रह नोंदवहीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे.

समाजमाध्यमातील बातमीनुसार वितरीत बाटलीवर नोंदी मिटलेल्या आढळत असल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०२५ पासून आजतागायत वातावरणाच्या परिणामामुळे सदर नोंदी मिटल्याची दाट शक्यता आहे. परंतु औषध भांडारातील उपलब्ध दस्ताऐवजानुसार खोल्याची औषध कालाबाह्य झालेले नसून त्याचा कालबाह्य दिनांक हा फेब्रुवारी २०२७ आहे.

या रुग्णालय प्रशासनाच्या स्पष्टीकरणानुसार ही औषधी वाटप करतांना ज्या औषधी निर्मात्याने ती वाटप केली आहे, त्याने सदर नोंदी पुन्हा एकदा तपासणे आवश्यक होते, परंतु रुग्णांच्या गर्दीमुळे अनावधानाने ही प्रकिया घडली नाही. या खोकल्याची औषधी कालबाह्य नसल्याचे श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Popular Articles