बुटीबोरी :- फिर्यादी नामे अभिजित वसंता नेवारे, वय २२ वर्षे, रा. निखाडे ले आऊट, सातगाव, ता. हिंगणा, जि. नागपूर यांनी बोरी पोलीस स्टेशनला माहीती दिली की, दिनांक ०९/०१/२०२६ रोजी फिर्यादीचे वडील वसंता रामाजी नेवारे, वय ४८ वर्ष हे नेहमीप्रमाणे रात्री ०९/३० वा. पर्यंत त्यांच्या मोटारसायकल ने कामावर गेले व दुस-या दिवशी दिनांक १०/०१/२०२६ रोजी सकाळी १०/०० वा. पर्यंत नेहमीप्रमाणे कामावरून घरी न आल्याने फिर्यादीने नातेवाईक व ओळखीचे लोकांकडे तसेच परिसरात त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. त्यांची मो.सा. सातगाव येथील एका दारूचे दुकानाजवळ सापडली. त्यामुळे फिर्यादीने पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे त्यांचे वडील बेपत्ता असल्याबाबत मिसींग तक्रार दाखल केली फिर्यादी नामे अभिजित वसंता नेवारे, वय २२ वर्षे, रा. निखाडे मा. श्री हर्ष ए. पोहार, पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात बुटीबोरी पोलीसानी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर वेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला असता सातगाव चौक येथे फिर्यादीचे वडील हे लोकेश धाबोर्डे याचे सोबत बोलत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी आरोपी लोकेश उर्फ लंक्या हिरालाल धाबोर्डे, २८ वर्षे रा. सातगाव, रिधोरा याला ताब्यात घेवुन त्याचे कडे कौशल्यपुर्ण विचारपुस कैली असता त्याने फिर्यादीचे वडील मृतक नामे वसंता रामाजी नेवारे, वय ४८ वर्ष, यांना वडगाव गुजर ता.जि नागपुर येथे नेवुन खुन केल्याचे कबुल केले नमुद प्रकरणी कलम १०३(१),३(५) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खुन करणाऱ्या आरोपीला तात्काळ केले अटक
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.