spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पर्यटनामध्ये मजबुत अर्थव्यवस्था उभारण्याची ताकद – चौकसे 

– २७ सप्टेंबर, विश्व पर्यटन दिन ‘ च्या अणुषंगाने मांडले मत

– नागपूर जिल्हयातील पर्यटन विकासातून युवकांना मिळू शकते संधी व आर्थिक स्थैर्य

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी ‘विश्व पर्यटन दिन’ साजरा केला जातो. पर्यटन हे केवळ मनोरंजन नव्हे तर अर्थव्यवस्था मजबूत करणारे आणि रोजगार निर्माण करणारे शक्तिशाली साधन आहे. नागपूर जिल्हयासाठी ही संधी अमूल्य आहे. योग्य नियोजन व गुंतवणूक झाली, तर आपला जिल्हा मध्य भारताचे पर्यटन केंद्र ठरू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रीय पर्यटन सल्लागार समीतीचे माजी तज्ञ सदस्य चंद्रपाल चौकसे यांनी नुकतेच एका मुलाखती दरम्यान विश्व पर्यटन दिनाच्या औचित्याने मांडले. रामटेक तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबाला रोजगाराच्या माध्यमातुन पोटाची भाकर दिली हे येथे उल्लेखनिय.

२७ सप्टेंबरच्या ‘विश्व पर्यटन दिन’ च्या निमित्ताने बोलतांना चंद्रपाल चौकसे म्हणाले की आपण नागपूर जिल्हयाच्या पर्यटन क्षमतेचा पूर्ण वापर करून ते रोजगार निर्मितीचे आणि युवक उद्योजगतेचे केंद्र बनवण्याची शपथ घ्यायला हवी. वाघ, तलाव, मंदिरे व वारसा या चार आधार स्तंभावर नागपूरला मध्य भारताची पर्यटन राजधानी बनवणे हे आता फक्त स्वप्न न राहता, प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. नागपूरात नव्हे तर विदर्भात प्रत्येक गावांत एक पर्यटन स्थळ बनन्याची क्षमता आहे. प्रत्येक गावांत पर्यटन स्थळ बनविल्यांस गावातील शेकडो बेरोजगारांना रोजगार तर मिळेलच पण आर्थिक स्थैर्य पण येणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हयांनी या बाबतीत पुढाकार घ्यायला पाहीजे असेही चौकसे म्हणाले.

पर्यटन का महत्वाचे? 

विशेषतः रामटेक तालुक्यात पर्यटनाचा खजिना दडला असुन त्याला फक्त शोधण्याची व त्यातुन मजबुत अर्थव्यवस्था कशी उभारता येईल यावर शंशोधन करण्याची गरज आहे. शंशोधनातुन सक्षम पर्यटन साध्य झाल्यास येथे येणाऱ्या पर्यटकात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. प्रत्येक पर्यटक आपल्या मागे अनेक रोजगार संधी सोडून जात असतो. त्यात मार्गदर्शक, रिक्षा,बस सेवा, होमस्टे, हॉटेल्स, हस्तकला विक्रेते, स्थानिक खाद्य व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग आदी. पर्यटनामुळे युवकांना उद्योजक होण्याची संधी मिळते आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होत असते, तेव्हा पर्यटन खुप महत्वाचे आहे असे राष्ट्रीय पर्यटन सल्लागार समीतीचे माजी तज्ञ सदस्य चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.

Popular Articles