spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिवणगाव येथील विक्तुबाबानगरचे प्रकल्पग्रस्त होतकरू गरीब लोक भूखंडापासून 30 वर्षापासून वंचित

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनवणी ! बहिणीची पत्रकार परिषदेत मागणी

– पुनर्वसन मध्ये घर न मिळाल्या संदर्भात विनवणी:

– समाजसेविका गीता तायवाडे यांची पत्रकार परिषदेमध्ये धाव

गेल्या पंचवीस ते ३० वर्षापासून शिवणगाव झोपडपट्टीत गरीब लोक राहतात. मात्र दहा कुटुंबातील लोकांनाच भूखंडापासून वंचित ठेवले आहे. शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्त विट्टूबाबा नगरातील भूखंडापासून राहिलेले 10 लोकांवर अन्याय होत आहे.

यांना पुनर्वसनाचे घर मिळावे यासाठी पत्रकार परिषदेमध्ये गीताताई तायवाडे यांनी आपबिती सांगितली

मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, आमच्या सोबत अन्याय झालेला आहे. आमचे घरे पडण्यासाठी मिहान वाले येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके भाऊ या दहा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार परिषदेमध्ये धाव घेतलेली आहे. अशी सुद्धा गिता यांनी पत्रकारांना सांगितले.

Popular Articles