नागपुर :- हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी नागपुर ग्रामीण जिल्हयातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना बक्षीसे जाहीर केली. यामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश नत्थुजी ताजने, नेम. पोलीस स्टेशन कुही यांना त्यांनी पोलीस खात्यात दिलेल्या गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती, भारत सरकार, यांच्या कडून गुणवत्तापूर्व सेवा पदक जाहीर झाल्याने तसेच चालक पोलीस हवालदार राजेश नत्थुजी सोनटक्के, ब.नं ३२५ नेम. मोटर परिवहन विभाग, नागपुर ग्रामीण यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याने यांना प्रोत्साहनार्थ बक्षीसे जाहीर केले.
उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय उमरेड, पोलीस स्टेशन मौदा, पोलस स्टेशन कळमेश्वर येथील अधिकारी आणि अंमलदारांना चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याबाबत, अवैध जनावरे, अवैध रेती तस्करी, अंमली पदार्थांबाबत अवैध धंदयांवर कारवाई केल्याने तसेच आर्थिक गुन्हे शाखा येथील अधिकारी/अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत प्रोत्साहनार्थ बक्षीसे जाहीर केली आहे.


