spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यापीठ परिघात रॅगिंगला वाव नाही -डॉ. पायल ठावरे

पदव्यूत्तर इतिहास विभागात अँटी रॅगिंग समुपदेशन
 
नागपूर १३ : विद्यापीठाच्या परिघात रॅगिंगबाबत वाव नसल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लाॅ येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. पायल ठावरे यांनी केले. पदव्युत्तर इतिहास विभागात अँटी रॅगिंग बाबत जागृती कार्यक्रम बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी पार पडला. यावेळी डॉ. ठावरे मार्गदर्शन करीत होते.

माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. शामराव कोरेटी यांनी भूषविले तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. पायल ठावरे यांची उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास विद्यार्थी रॅगिंगच्या बाबतीत कुठलीही घटना मिळत नसल्याचे डॉ. ठावरे यांनी पुढे बोलताना सांगितले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. येणाऱ्या पिढीला रॅगिंग पासून सावध करणे समाजातील सर्व सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी योग्य समुपदेशन घडवून आणणे आवश्यक असल्याचे डॉ. ठावरे म्हणाल्या.
कुठलीही संस्था किंवा महाविद्यालय हे एका कुटुंबासारखे असतात. आपल्या घरात जेवढे आपण स्वतंत्र असतो, तेवढेच स्वातंत्र्य आपल्या महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये सुद्धा असायला हवे. एखादा अनोखा व्यक्ती गरज नसताना काहीतरी बोलून जातो किंवा कुठलीतरी कृती करायला लावतो. तेव्हा, खऱ्या अर्थाने समस्या निर्माण होतात. रॅगिंगच्या बाबतीत खूप कमी गोष्टी समाजासमोर येतात आणि म्हणून प्रत्येक सुजाण नागरिकाचे हे काम आहे की माझ्या ओळखीतल्या किंवा सोबतच्या व्यक्तीसोबत कुठल्याही प्रकारची रॅगिंग होणार नाही. याची दक्षता घेणे गरज आहे. जुनिअर विद्यार्थ्यांकडून चुकीचं बोलून घेणे, चुकीचे हावभाव करून घेणे किंवा चुकीच्या हावभावाचे इशारे करणे हे रॅगिंग मध्ये मोडतात. रॅगिंगच्या बाबतीत समाजात खूप चुकीच्या कल्पना प्रस्थापित आहे. नवीन विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभ आयोजित करावा आणि त्यातून सीनियर ज्युनिअरची ओळख करून घ्यावी व त्यांनी आपल्या निवेदनात प्रत्येक मोठ्या महाविद्यालयात किंवा संस्थेत दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी रॅगिंगच्या दहशतीमुळे सोडून जातात. याकरिता समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. प्रत्येकाला सन्माननाणे जगण्याचा अधिकार आहे. रॅगिंगच्या भीती काही अनेक विद्यार्थी महाविद्यालय सोडून जातात किंवा महाविद्यालय बदलवितात. संपूर्ण देशात रॅगिंगचे प्रकरण वाढत असल्यामुळे भारत सरकारने १९९६ मध्ये राजगोपालाचारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार रॅगिंग विरोधात एका कठोर कायद्याची निर्मिती झाली, असे त्यांनी सांगितले. रॅगिंगचा बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी कुठे तरी तक्रार करायला हवी त्यातून त्याला न्याय मिळू शकतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शामराव कोरेटी यांनी आपल्या निवेदनात रॅगिंग बाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांच्यापासून कोणीही हिरवू शकत नाही. रॅगिंगच्या बाबतीत आज मोठ्या प्रमाणात जागरूकता घडून आणणे आवश्यक आहे. वर्तमानात डिजिटल स्वरूपात केलेला संदेश सुद्धा रॅगिंगमध्ये मोडू शकतो. परवानगी न घेता एखाद्या छायाचित्र अपलोड करणे हे सुद्धा रॅगिंग मध्ये मोडतात. सीसीटीव्ही असून सुद्धा आपण सुरक्षित नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. प्रदीप चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अलिषा सहाय यांनी केले तर आभार डॉ. मृणालिनी रांगणे यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.