spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाघाने केली महिला शेतमजुरांची शिकार

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील पवनी वनविभागाच्या पिपरिया (सिल्लारी) येथील शेतात तुरीच्या शेंगा तोडत असतांना महिला मजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही महिला शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना वाघाने तिला फरफटत नेले. पवनी बफर झोनमध्ये कक्ष क्रमांक २५४ मध्ये मंगळवारी (दि.६) सायंकाळी ही घटना घडली. मृत महिला शेतमजुराचे नाव संगीता गोपीचंद वघारे अंदाजे (वय ४o) वर्ष असे आहे. या घटनेमूळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. माहितीनुसार रामटेक तालुक्यांतर्गत असलेल्या पवनी वन विभागाच्या एक संघ नियंत्रण कक्ष सिल्लारी येथील रहवासी संगीता गोपीचंद वघारे अंदाजे (वय ४०) वर्ष या नेहमीप्रमाणे मंगळवारला(दि.०६) सकाळी दुसऱ्याचा शेतात तुरीच्या शेंगा तोडण्या करिता गेल्या होत्या. सांय. ५ वाजताचा सुमारास शेतालगतच्या झूडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर केला. त्यांच्या घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. जवळच शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना आरडाओरड ऐकू आल्याने ते घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत वाघाने महिलेला ठार केले होते. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात खळबळ उडाली. घटनेची सूचना मिळताच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली असून वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामस्थांना एकट्याने शेतात जाणे टाळावे तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हा संपूर्ण परिसर संपूर्ण जंगलव्याप्त आहे. या भागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर आहे. सध्या शेतीच्या हंगाम सुरु आहे. शेतकरी व शेतमजुरांना आपल्या पोटाच्या भाकरीसाठी शेतात जाणे भाग पडते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे जंगलव्याप्त गावात शेती करणे कठीण होत आहे. या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.