spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाघ/बिबट्याने केली शेतातील गोठ्यात कारवट शिकार…

भेंडाळा शिवारातील घटना; पशुपालक व नागरिक भयभीत

खापा,  १८ :  सावनेर तालुक्यातील भेंडाळा  शिवारात एका वाघ/बिबट्याने कारवटची शिकार केल्याची घटना शुक्रवारी (दि. १५) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. जनावरांच्या शिकारीमुळे पशुपालक व शेतकरी भयभीत झाले आहे.

शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दैनंदिनीनुसार गोपालक शेतकरी इसराईल इब्राहिम बराडे (वय ५२)रा. वाकोडी ता. सावनेर यांच्या भेंडाळा शिवारातील शेतात गुरांच्या चाऱ्या पाणी व गोठ्याच्या साफसफाईसाठी गेले असता त्यांच्या मालकीचे वासरू त्यांच्या शेतात असलेल्या गोठ्यात दिसून आले नाही. घटनेपूर्वी रात्री ते गोठ्यात बांधून गेले होते. शिकारीच्या शोधात असलेल्या वाघाने/बिबट्याने झडप देत कारवटची भेंडाळा येथील शेतात शिकार केली. कारवटला शोधले असता, हिंस्त्र प्राण्याने कारवट शेताला लागून असलेल्या झुडपात घासत नेले असल्याचे दिसून आले. व त्याचा मागील भाग खाल्लेला दिसला.

घटनेची माहिती समजताच घटनास्थळी शेतकरी व नागरिकांनी गर्दी केली. खापा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. जनावराच्या शिकारीमुळे येथील पशुपालक शेतकरी त्रस्त व भयभीत झाला आहे. वन विभागातर्फे होणाऱ्या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत आहे. शेतकरी भीती बाळगून शेतात कार्य करीत आहे. गोपालक इसराईल इब्राहिम बराडे यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी व जंगली हिंसक जनावरांचा कायमचा बंदोबस्त लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पप्पू बराडे, अखिल बराडे, जिब्बु बराडे यांनी केली आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.