spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूर च्यावतीने शिवजयंती 2026 उत्सव १ मार्च ला साजरा करणार

नागपूर :- तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे शिवजयंती उत्सव सत्कार सोहळा रविवार दिनांक १ मार्च रोजी, सकाळी १० वाजता. तिरळे कुणबी सेवा मंडळ, टाऊन हॉल आशीर्वाद नगर नागपूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचे मिशन आय ए एस, वरील प्रबोधन व मार्गदर्शन तसेच सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन: “आजच्या परिस्थितीत कोणत्या पद्धतीने अंगीकारावा” यावरील विलासजी इंगोले ह्यांचे व्याख्यान आयोजित केले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे तसेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन माजी आमदार सुधाकर देशमुख यांची उपस्थिती राहतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नीता राजेंद्र ठाकरे ह्या पहिल्यांदाच महापौर झाल्या त्याबद्दल त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. यांच्यासहित इतरही मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. असे मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग वाकडे पाटील यांनी म्हटले आहे. कार्यक्रमाचे आयोजन तिरळे कुणबी सेवा मंडळाने केले असून यावेळी महादेवराव बोराडे, सचिव नितीन हांडे आणि रमेश टाले परिश्रम घेत आहे. तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या वतीने समाजातील मान्यवर व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार आयोजित केला असून सर्व समाज बांधव व शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे व सहकार्य करावे. असे आवाहन अध्यक्ष पांडुरंग वाकडे पाटील यांनी केले आहे.

Popular Articles