spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे आज भाजपा किसान आघाडी तर्फे शेतकरी मेळाव्या सह विविध कार्यक्रम 

किशोर साहू, मौदा :- भाजपा किसान आघाडी मोर्चा तर्फे उद्या शनिवार (ता. 14 फेब्रुवारी)ला सायं. 5 वाजता चाचेर येथील रामटेक – मौदा रोड स्थित दत्तात्रय हायस्कूल समोरील रुक्मिणी सेलिब्रेशन लॉन येथे शेतकरी मेळावा,कार्यकारिणी नियुक्ती पत्र वाटप ,बजेट सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी राहणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा पदाधिकारी अनिल निधान,रिंकेश चवरे ,महामंत्री भाजपा जिल्हा रामटेक राहुल किरपान,अध्यक्ष जिल्हा भाजपा किसान आघाडी डॉ. राजेश ठाकरे,चाचेर मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण सह गावातील ,परिसरातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील भाजपचे इतरही पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाच्या भाजपा किसान आघाडी मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, सदस्यगण व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान जिल्हा महामंत्री भाजपा किसान आघाडी संकेत झाडे,उपाध्यक्ष जिल्हा भाजपा किसान आघाडी खेमराज चाफले सह समस्त पदाधिकारी यांनी केले आहे.

Popular Articles