किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता. 25 जुलै)ला समर्थ रामदास हायस्कूल अरोली येथील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून विठ्ठलाच्या वारीचे अगदी सुंदर नियोजन केले व गावामध्ये वारीच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण तयार करण्यात केले. तसेच चैतन्येश्वर पार्वती मंदिर परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमाला सरपंच रोशनी प्रशांत भुरे , शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे , शाळेचे संचालक शिवाजी कुंभलकर, मुख्याध्यापक बडवाईक, तंटामुक्त अध्यक्ष कैलास समरीत सह शाळेतील शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी शाळेतील मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले.








