संजय कारवटकर, यवतमाळ ५ : कर्मवीर दादासाहेब कन्नमवार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बेलदार समाज भवन पाटणबोरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजीव कासावार सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती झरी जामणी प्रमुख पाहुणे मलारेड्डी पानजवार माझी सभापती बेलदार समाज जिल्हाध्यक्ष रमेश बनपेलीवार पाटणबोरी शाखा अध्यक्ष शंकर नक्कलवार गंगारेड्डी सुंकरवार सुधाकर मुत्यलवार माझी सभापती राजेश्वर गोड्रारवार श्रीनिवास नुगुरवार तसेच समाजातील सर्व पदाधिकारी तरुण महिला मंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन देविदास चंदावार यांनी केले तर आभारप्रदर्शन रवि पडलवार यांनी मानले सांस्कृतिक भवन , प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस चौकी मागे, शिवमंदीर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.








