नागपूर :- सत्यमेव जयते शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर द्वारा संचालित एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय व एकात्मता हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व संस्थापक अध्यक्ष दिवंगत डॉ.चंद्रहास मारोतराव वंजारी यांचे चतुर्थ पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव दशरथ बनसोड प्रमुख पाहुणे म्हणून हायस्कूलचे मुख्याध्यापक यालेशकुमार बोरकर कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा मानवटकर यांनी केला. कार्यक्रमामध्ये दिवंगत अध्यक्षांप्रति त्यांच्या आठवणीना उजाळा देऊन अभिवादन व आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कातुरे यांनी केले. कार्यक्रमाला जयमाला बारंगे, श्वेता सरटकर, वैशाली रोकडे, ममता टेकाम, पंकज देशपांडे, शैलेश कापसे, विनोद कोटगले, दुर्गा हिरेखन, गौतम बनसोड, रमेश दिघोरे, धनश्री ढेगेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता पुसतकर व शरद उरकुडे यांनी प्रयत्न केले.
एकात्मता विद्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष यांना आदरांजली


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



