spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजधानीत पंडित नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली :- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल आणि सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी सविता अहेर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची आणि देशाच्या उभारणीत त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली.

Popular Articles