किशोर साहू, मौदा :- मागील नवव्या वर्षाप्रमाणे यंदा दहाव्या वर्षीही कोदामेंढी येथील आयोजक श्री संत गजानन महाराज भजन व पारायण मंडळ व समस्त ग्रामवासी तर्फे श्री राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई सार्वजनिक देवस्थानात उद्या शनिवार (दि. 7 फेब्रुवारी) पासून दोन दिवसीय श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सवाला सुरुवात होत आहे.
शनिवारला सकाळी सात वाजता श्रीं चा अभिषेक, घटस्थापना व आरती, आठ वाजता साखळी पारायण ,अकरा वाजता महाआरती नंतर भजनाच्या कार्यक्रम. सायंकाळी सात वाजता महाआरती व लगेच भजन, रविवार दिनांक 8 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी आरती व तदनंतर गावातील चारही वार्डातून श्री चा पालखी मिरवणूक सोहळा. सायंकाळी सात वाजता महाआरती व लगेच महाप्रसादाचे वितरण. तरी या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.




