– १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
बेला :-पोलीस स्टेशन बेला येथे फिर्यादी उषा केशव नेवारे, रा. टेबरी यांनी तकार दिली की, दिनांक ३१/१२/२५ रोजी त्यांचे घरी तीन अज्ञात इसम भिक्षा मागणे कामी आले त्यांनी फिर्यादीला आणि फिर्यादीच्या मुलीला तुमच्या घरावर मोठे संकट येणार आहे, संकटापासून वाचण्याकरिता तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून दया दागिने उद्या परत आणून देतो असे कारण सांगून फिर्यादी आणि तिच्या मुलीचे ताब्यातील दोन मंगळसुत्र, बिरी आणि झुमके असे दागिने पळवुन नेले. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन बेला येथे कलम ३१८, ३१८(१), ३१८(५), ३(५) भान्यास अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हयाचा तपास बेला पोलीस करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुध्दा समांतर तपास सुरू केला. दिनांक ०३/०१/२०२६ रोजी बेला पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक पध्दतीने तपास करून सदर गुन्हयातील आरोपी १) विजय सोजीराम वाष, वय २६ वर्ष २) राजु पिसाराम गुजर, वय २९ वर्ष, ३) दिपक तुलसीराम यादनेकर, वय ५८ वर्ष, सर्व रा. सेलु ता कळमेश्वर जि नागपुर यांना निष्पन्न केले. अवघ्या २४ तासाच्या आत सर्व आरोपीतांना सेलु येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल दागीने किंमती १,१०,०००/- रूपये आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन २) हिरो स्प्लेन्डर प्लस मो सा क्र एमएच ४० सीजी १८४० किंमती ७०,०००/- रूपये आहे.