spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रस्तावित हाय-स्पीड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा

नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणे, लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन व अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणे या उद्देशाने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागपूर-भंडारा टप्प्याचे सहा पदरीकरण, तळोदा-बुऱ्हाणपूर टप्प्याचे चार पदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम) कॉरिडॉर, ग्वाल्हेर-नागपूर कॉरिडॉर, नागपूर-हैदराबाद कॉरिडॉर, भंडारा-रायपूर टप्प्याचे सहा पदरीकरण, लखनादोन-दुर्ग-रायपूर कॉरिडॉर, नागपूर-अमरावती टप्प्याचे सहा पदरीकरण, एनएच-44 वरील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमा-नागपूर बायपास-बोरखेडी टप्प्याचे तसेच पुणे-सातारा टप्प्याचे सहा पदरीकरण या प्रकल्पांचा समावेश होता.

या बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील एकूण 527 किमी लांबीच्या नऊ बीओटी प्रकल्पांचाही सखोल आढावा घेण्यात आला. यात शिरूर-अहिल्यानगर, अहिल्यानगर-वडाळा, वडाळा-छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, जालना-वातूर, नांदेड-नरसी-देगलूर, जाम-वरोरा, वरोरा-चंद्रपूर-बामणी आणि मलकापूर-चिखली या कॉरिडॉरचा समावेश आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.