Saturday, February 21, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आंरिमोच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे अनावरण

नागपूर :- आंरिमोच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.  रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चे दहन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विरोधाचा बदला घेवून पुरोगामी विचारसरणीची पकड घट्ट केली हेच विचार रयतेला कळले पाहिजे म्हणून जिथे शिवाजी तिथे डॉ. आंबेडकर हे मिशन चालवण्याचे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने संकल्प केला आहे. या प्रसंगी आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केले. प्रा. रमेश दुपारे यांनी दिपप्रज्वलन केले. कार्यक्रमात चरणदास गायकवाड, राजु दादा पांजरे, सुरज ढोणे, पुण्यशील बोदिले, अभिषेक मिश्रा, हंसराज उरकुडे, रोहित पांडे, राहुल द्विवेदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com