spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवेगाव नागझीरा व्याग्र प्रकल्प अंतर्गत जि प शाळा वडेगाव येथे विविध खेळाचे आयोजन

तिरोडा :- येथील जिला परिषद शाळेमध्ये नवेगाव नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्र वनपरीक्षेत्र अंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, हॉलि्बॉल स्पर्धा अशा विविध प्रकारचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी वडेगावातील सरपंच शामराव बिसेन, पोलीस पाटील मुन्ना सोनेवाने, वनपरीक्षेत्र अधिकारी एस. पी. टेबरे, क्षेत्रसहाय्यक लिल्हारे सोनेगाव, क्षेत्र साहाय्यक, गौतम चोरखमारा, क्षेत्रसाहाय्यक गडलिंगे लोणारा, उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये वडेगाव, चोरखमारा, कोयलारी, सर्रा, लोणारा, नांदलपर, या गावातील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी नी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्कृष्ठपणे पार पाडले त्यात हॉलि्बॉल स्पर्धेमध्ये जि. प. हायस्कुल वडेगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकवीला व द्वितीय क्रमांक कोयलारी आश्रम शाळा ने पटकवीले या कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी एस. एम. सरनागात, एस. एम. भालेराव, सागर भेलावे, निशा येळे, सुनील गौतम, वृतुजा झनझाड, मनोज बर्डे, प्रेमसागर पटले, समीर नरनावरे, प्रशांत चौधरी, राजेश बिसेन, मुकेश कालसर्पे, वडेगाव एस. टी. पी. एफ. जवान यांनी सहकार्य केले.

Popular Articles