Monday, February 16, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

न.प.च्या बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा खापा येथील विकासकामांना मंजुरी, स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या नावांचे भित्तीचित्र (म्युरल आर्ट) होणार साकार

खापा, वार्ताहर :- खापा नगर परिषदेत बुधवारी विशेष विकासकामांना मंजुरी देण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांनी मांडलेले विविध प्रस्ताव सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) २०२५-२६ अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून खापा नगर परिषद क्षेत्रातील ६० महिलांना रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच माळीपुरा येथील उद्यानात स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या नावांचे भित्तीचित्र (म्युरल आर्ट) साकारण्यासही सभेत संमती देण्यात आली. यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण योजना अंतर्गत नगर परिषद राजेंद्र हायस्कूल येथे स्मार्ट टॉयलेट बांधकाम, नगर परिषद कस्तुरबा शाळेत दोन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच नगर परिषद जिजामाता प्राथमिक शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्याचे प्रस्तावही पारित झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com