किशोर साहू, मौदा, ता.२३ :- दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन व पाच दिवसीय मंडईनिमित्त दसरा मैदान इंदोरा येथे गट ग्रामपंचायत इंदोरा अंतर्गत येणाऱ्या इंदोरा व इंद्रपुरी गावातील महिला बचत गटातील महिला तसेच गावातील महिला व तरुणींसाठी शनिवार (दि. 24 जानेवारी)ला विविध सामूहिक स्पर्धा व वैयक्तिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 25 व 26 जानेवारीला भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता व नवयुवक उत्साह मंडळ इंदोरा तर्फे भव्य मंडई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्य 27 जानेवारी ला सायंकाळी सात वाजता रिकी अँड ग्रुप कोल्हापूरचा झिंगाट प्रस्तुत सांस्कृतिक लावणी कार्यक्रम तर 28 जानेवारीला सकाळी दहा वाजता पासून जि भंडारा ता लाखनी कलंगी पार्टी सोमलवाडा येथील शाहीर अंबादास यांच्या राष्ट्रीय संगीत खडा तमाशा व रात्री आठ वाजता सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित केले आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये गावातील, परिसरातील, तालुक्यातील ,जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तसेच व्यापारी संघातील मान्यवरांतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. या भरगच्च पाच दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन सरपंच नेकसिंग गहेरवार, उपसरपंच नकुल लोनिया, ग्रामपंचायत सदस्य गण वीरेंद्र सेंगर, ऋषीराज सेंगर, सरोज सेंगर, प्रतिभा नवनिया अरुणा कछवाह, सारिका लोणारे, सचिव जयेंद्र सोलंकी सह समस्त ग्रामवासियांनी केले आहे.
इंदोरा येथे उद्यापासून पाच दिवसीय मंडई निमित्त विविध खेळस्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.