Thursday, February 26, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विदर्भ विचार मंचातर्फे विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंना श्रद्धांजली

नागपूर :- विदर्भ विचार मंच तर्फे आयोजित कार्यक्रम 18 फेब्रुवारी रोजी, पत्रकार क्लब ऑफ नागपूर सिव्हिल लाईन येथे नुकताच पार पडला. ९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्वप्रथम श्रीकांत धोटे यांनी दीप प्रज्वलन केले.

जांबुवंतराव धोटे च्या प्रतिमेला मल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्वाला धोटे यांच्या अध्यक्षतेखालील -विदर्भ विचार मंचचे अध्यक्ष सुनील चोखारे, रिपाईचे नेते यशवंत तेलंग, भारतीय किसान परिषदेचे योगेश ठाकरे, तन्हा नागपुरी, नितीन चौधरी, सुरेश वर्ष, अरुण केदार, इमरान भाई, आणि डॉ.अनिल वाघ आणि इलाकृती उमक या मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. जांबुवंतराव धोटे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. असे मत यशवंत तेलंग यांनी मांडले. विदर्भाची घोषणा मुख्यमंत्री यांनी त्वरित करावे. योगेश ठाकरे यांनी म्हटले. संचालन प्रताप काशीकर यांनी केले तर सिताराम लोणकर यांनी आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com