spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विजय गजभिये यांचा उमरेडला अमृत महोत्सवी जन्मदिवस सोहळा थाटात

उमरेड नागपूर :- कर्मनिष्ठ समाजसेवक विजय गजभिये यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी जन्मदिवसानिमित्त आयोजित भव्य सत्कार सोहळा प्रेरणा सेलिब्रेशन लॉन, उमरेड येथे उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांचा सत्कार, विचार प्रतिष्ठान स्मरणिका विशेषांकाचे प्रकाशन तसेच विजय गजभिये यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफितीचे लोकार्पण उमरेड मध्ये 19 जुलै रोजी, प्रेरणा सेलिब्रेशन लॉन व हॉल गिरड रोड उमरेड येथे थाटामाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विकास जागेश्वर सिर्सीकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिजीत वंजारी, माजी खासदार प्रा. डॉ खुशाल बोपचे, देविदास घोडेस्वार, नगराध्यक्ष प्राजक्ताताई कारु, माजी सरकारी वकील अनुराधा तायवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजय गजभिये यांच्या सामाजिक, शैक्षणिक व जनसेवेतील योगदानाचा गौरव करण्यात आला. विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनी त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार केला. कार्यक्रमात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संयोजन समितीचे प्रमुख डॉ. कृष्णा बेले यांनी विशेषकांच्या बाह्य व अंतरंगावर मार्मिक भाष्य करून सर्वांप्रती ऋण निर्देश व्यक्त केले हे विशेष: याप्रसंगी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले. आणि शेकडो उपस्थितांनी सोहळ्याला उपस्थिती दर्शविली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. सत्कारमूर्ती गजभिये अमृत महोत्सवी जन्मदिवशी सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविक मायाताई मेश्राम यांनी केले तर संचालन प्रा. रमेश पिसे यांनी केले आणि सरते शेवटी सत्कारमूर्ती विजय गजभिये यांनी सर्वांचे अत्यंत मार्मिक व भावुक आपले मनोगत व्यक्त केले. आणि संजीवनी बागडे हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular Articles