spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामगारांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

– अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्गो कार्यालयाचे उत्साहात उ‌द्घाटन

मुंबई :- नव्याने सुरु करण्यात आलेल्या संघाच्या कार्यालयामुळे कार्गो विभागातील कामगारांना संघटनेशी थेट संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कामगारांच्या अडचणी, सेवा-संबंधित प्रश्न, वेतन व भत्ते, कामाच्या अटी, रोजगाराची सुरक्षितता, कायदेशीर हक्क आणि इतर औद्योगिक प्रश्न याबाबत संघटना अधिक प्रभावीपणे काम करू शकेल असा विश्वास अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी विविध कामगार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने सहार रोड येथील कार्गो परिसरातील संघाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संघाचे आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय कर्मचारी सेनेतील शेकडो वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात प्रवेश केला. तसेच, वाहतूकदारांची मोठी संघटना असलेली ऑल इन वन ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशन ही अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाशी संलग्न झाली आहे. त्याचप्रमाणे, AIASL मधील भारतीय कामगार सेना (उबाठा) चे सुमारे 450 सदस्य कामगार आज अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सदस्य झाले. या प्रवेशामुळे कार्गो विभागात संघटनेची ताकद आणि प्रभाव अधिक मजबूत होणार आहे.

यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, हा प्रवेश केवळ सदस्यसंख्येतील वाढ म्हणून पाहता येणार नाही, तर कार्गो विभागातील कामगारांमध्ये वाढत असलेल्या विश्वासाचे आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्यपद्धतीला मिळत असलेल्या व्यापक प्रतिसादाचे प्रतीक आहे.

Popular Articles