कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या मोदी पडाव भागातील महानंदा रमेश बोरकर यांच्या घरी लावलेल्या मोबाईल टॉवर्स मधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने हे टॉवर्स मांनववस्तीपासून दूर असावे या मुख्य उद्देशाने महानंदा बोरकर यांच्या घरी लावलेले मोबाईल टॉवर त्वरित हटविण्यात यावे अन्यथा कांग्रेस सेवादल तर्फे तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा ईशारा कामठी शहर कांग्रेस सेवादल चे ब्लॉक अध्यक्ष समाजरत्न डॉ सुनील वाघमारे यांनी नायब तहसिलदार अमर हांडा यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून दिला आहे.
भ्रमणध्वनीच्या कव्हरेज साठी अनेक ठिकाणी टॉवर्स उभारले आहेत हेच टॉवर्स नागरिकासाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे या टॉवर्स मार्फतच संबंधित भ्रमणध्वनी कंपणो आपल्या ग्राहकांना सेवा पुरविते त्यातून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो सोबतच इतर पशुपक्षी वरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते .केंद्र सरकारने सण 1996 मध्ये नवीन पर्यावरण कायदा अस्तित्वात आणला परंतु या कायद्याची टॉवर्स उभारताना सर्रास पायामल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.या कायद्यानुसार टॉवर्स उभारनीसाठी काही मार्गदर्शक तत्वे पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे.टॉवर्स हे मानवी जीवनाला अपायकारक ठरण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी हे टॉवर्स विजेवर चालतात , वीज नसल्यास डिझेलचा वापर करण्यात येतो त्यातूनही प्रदूषणाला चालना मिळते त्यामुळे भ्रमणध्वनी ही आवश्यक वस्तू झाली असली तरी त्याकडे जागृतत्तेने बघण्याची गरज आहे.
टॉवर्स च्या लहरींमुळे कर्करोग, हृदयरोगाची भितो तसेच डोळ्यांचे व हाडांचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तशी सूचना विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने वर्तविली आहे.टॉवर्स मधून निघणाऱ्या कीरणोत्सवाच्या लहरींमुळे लहांन मुलांना व्यगत्व, आंधळेपणा ही येण्याची शक्यता असते एकूणच टॉवर्स मांनववस्तीपासून दूर असावेत .टॉवर्स 200 फूट उंच असले तरी त्यातुन निघणाऱ्या उच्च कीरणोत्सर लहरी 200 फूट समांतर जमिनीस सिमेंट कंक्रोट च्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो तेव्हा कामठी शहरातील मोदी पडावं येथील महानंदा बोरकर यांच्या घरी जमिनीपासून बसविलेले मोबाईल टॉवर त्वरित हटविन्यात यावे अशी मागणी मोदी पडावं च्या काही जागरूक नागरिकांच्या वतीने कांग्रेस सेवादल चे ब्लॉक अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे यांनी केली आहे.
निवेदन देताना कांग्रेस सेवादल चे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव राजकुमार गेडाम,विपीन गायकवाड,भारत पाटील,रामलाल मेश्राम,नंदा मेश्राम, दिनेश पाटील,मुकेश भीमटे,मोहन ढबाले आदी उपस्थित होते.