spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणार ! खासदार श्यामकुमार बर्वे

तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन शिष्टमंडळाने खासदार बर्वेची घेतली भेट.
नागपूर २०  : महावितरण मधील ३२९ उपकेद्र हे क्रिस्टल इंटिग्रेटेड सव्हिर्सेस लिमिटेड व स्मार्ट सर्विसेस कंपनीला कामगार पुरविण्यासाठी दिले आहे. कंपनीच्या कामगार विरोधी मनमानी कारभाराला त्वरित आवरा अशा स्वरूपाचे मागणी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या कडे तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन ने प्रत्यक्ष भेटून केली असल्याची माहिती कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी दिला आहे. राज्यातील 329 उपकेंद्रा मध्ये महावितरण, प्रकाशगड, मुख्यकार्यालय स्तरावरून निविदा प्रसारित करून त्याद्वारे संपुर्ण राज्यामध्ये एकाधिकार शाही व जुलमी पध्दत राबविण्यासाठी क्रिस्टल इंटिग्रटेड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी व स्मार्ट सींस कंपनीला कंत्राटी यंत्रचालक पुरविण्याचे कामे दिली आहे. या एकाधिकार शाहीला अगोदर सुध्दा संघटनेने तिव्र विरोध दर्शविला होता. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी व ईतर कंपनीची कार्यपध्दत हि आक्षेपार्ह आहे. काम सुरू असलेल्या अनेक ठिकाणी या कंपनीने कामगारांचे वेतन अदा (तिन ते चार महीन्यापासुन) केलेले नाही. त्यांच्यावरील होत असलेल्या शोषणाच्या बातम्या निश्चीतच विचलित करणाऱ्या आहेत. त्यांची प्रतिमा जनमानसात पुर्णपणे मलीन आहे. अशा कामगारव्देषी व कायद्याचे पालन न करणाऱ्या कंपनीला काम दिल्याने कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. या कंपन्यानी आता संपुर्ण महाराष्ट्रातील उपकेंद्रामध्ये यंत्रचालक पुरविण्याच्या कामास सुरूवात करण्यापुर्वी सद्य स्थितीत कार्य करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना संपर्क साधणे सुरू केले आहे. होत असलेल्या संपर्कातुन अनेक अन्यायकारक बाबी पुढे येत आहे. यामध्ये सद्यःस्थितीत कार्य करीत असलेल्या उपकेंद्रातील कंत्राटी कामगारांना परत कंपनी च्यावतीने कामावर घेण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मागणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, कंत्राटी कामगारांना विविध प्रकारे भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, कंत्राटी कामगारांचे काम सुरू होण्या अगोदरच राजीनामा पत्र लिघुन घेत आहेत. कंत्राटी कामगारांवर विशिष्ट संघटनेचे सभासदत्व स्विकारण्यासाठी दबाव टाकत आहे. तसेच सभासदत्व स्विकारल्या नंतरच आदेश देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे, कंत्राटी कामगारांना कोणत्याही प्रकारची आठवडा सुट्टी व ईतर लाभ मिळणार नाही अशा पध्दतीचे नियमबाहय करारनामे जबरदस्ती लिहुन घेतल्या जात आहेत. अश्या सगळ्या असंविधानिक बाबी कंत्राटी कामगारावर लादण्यात येत आहे. या हुकूमशाही वृतीला त्वरित शासनाने आळा घालावा. अशी मागणी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या कडे तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या शिष्ट मंडळाकडून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, अनिवेश देशमुख, निशांत काळसर्पे, विकास ठुसे, जयपाल हटवार, प्रफुल डोये, विपुल चकोले, मयूर कटारे, अमित गोमकाळे, मिलिंद कडू, विशाल देशमुख आदींची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.