नागपूर :- राज्यस्तरीय ओबीसी चिंतन शिबिर एमटीडीसी गेस्ट हाऊस नागपूर या ठिकाणी संपन्न झाले. विविध सामाजिक संघटनांचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी सदर चिंतन शिबिरामध्ये उपस्थित होते. 2 सप्टेंबर 2025 चा जीआर रद्द करण्यासाठी 7, 8 व 9 डिसेंबर 2025 ला धरणे आंदोलन आणि 10 तारखेला सर्वव्यापी सकल बहुजन समाजाच्या विधान भवनाला घेराव आंदोलन करण्याच्या संदर्भातली भूमिका उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी जी नेते मंडळी ओबीसी जागृती करता कार्यरत आहे, त्या सर्व नेतेमंडळींशी चर्चा करून आणि त्यांचा होकार मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल अशा पद्धतीची भूमिका उपस्थित सर्व राज्यव्यापी ओबीसी नेत्यांनी सदर बैठकीमध्ये आपले मत व्यक्त केलेले आहे. राज्य सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबर 2025 चा जीआर रद्द करण्याकरिता भाग पाडावे त्याकरता जनजागृती करावी आणि प्रत्येक ओबीसी जात समूहाला या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता प्रेरित करावे, ही भूमिका सुद्धा बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार तथा ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे यांनी व्यक्त केली. ओबीसी क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कृष्णाजी बेले यांनी मान्यवर कांशीरामजींनी ज्या पद्धतीने समाजामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. आणि संपूर्ण देशांमध्ये बहुजनांची लहर निर्माण केली मंडल आयोग लागू करून घेतला, तीचभूमिका आता ओबीसींनी स्वीकारावी अशा पद्धतीचे मत याप्रसंगी व्यक्त केले.

ओबीसी जन मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठांमध्ये 18 ते 30 वयोगटातील मुला-मुलींना पाच पाच दिवसाचे दर महिन्याला प्रशिक्षण दिल्या जाते. त्यांना चळवळीची भूमिका समजावून सांगितल्या जाते त्याकरता आपलं सहकार्य असावं ही भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. रमेश पिसे यांनी एकंदरीतच ओबीसी चळवळ आता मोठ्या प्रमाणात जागृतीच्या दिशेने कार्यरत आहे. ओबीसी सोबत एससी, एसटी आणि मायनॉरिटी च्या लोकांना सुद्धा आपण सोबत घेऊन, आपलं सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय भवितव्य उज्वल करण्यासाठी प्रयत्नरत राहावं अशी भूमिका मांडली. ओबीसी युवा अधिकार मंचचे उमेश कोराम यांनी १० तारखेचा मोर्चा यशस्वी करण्याकरता माजी विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे गटनेते विजय वडेंटीवार यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि तमाम महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना सहकार्य केलं त्याकरता आपण सगळ्यांनी त्यांचेही अभिनंदन केलं पाहिजे हा ठराव मांडला. सभागृहाने एकमताने सदर ठराव मंजूर केला. ओबीसी बांधवांना जागृत करण्याकरता एकत्रित येऊन पुढचा लढा आता आपण घडला पाहिजे असे मत डॉ.विलास काळे यांनी व्यक्त केले. ओबीसी आंदोलन चालवण्यासाठी महिला व मुलींना मुलांना ही सगळी चळवळ आपण समजावून सांगितली पाहिजे अशी भूमिका सुनीता काळे यांनी मांडली. पाटी लावा अभियानच्या प्रमुख एडवोकेट अंजली साळवे यांनी चळवळ कशी मोठी केली पाहिजे त्याकरता केलेल्या कार्याचा इतिवृत्तांत सादर केला. एडवोकेट समीक्षा गणेशे यांनी ओबीसी वकील महासंघ हा या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत राहील या पद्धतीची भूमिका मांडली.

याप्रसंगी संपूर्ण विदर्भातून प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी आले होते जेष्ठ मार्गदर्शक नागेश चौधरी यांनी इथली व्यवस्था कशी आपला शोषण करत आहे याची भूमिका मांडली. मुस्लिम ओबीसी चे नेते जावेद पाशा कुरेशी यांनी राजकीय भूमिका ओबीसीच्या विरोधी शासन कशा पद्धतीने निर्माण करत आहे, आणि आपल्या पायावर आपण जागृत झालो नाही तर आपणच गोटा पाडून घेऊ तो गोटा पडू द्यायचा नसेल तर हा जीआर रद्द करून फार गरजेचा आहे या पद्धतीची भूमिका व्यक्त केली. गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी सुद्धा याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये एक महत्त्वपूर्ण ठराव वर्धा येथील युवा ओबीसी कार्यकर्ते नेते प्रफुल गुल्हाने यांनी मांडला की ज्यांनी २ तारखेचा काळा जी आर काढला त्यांना आता ओबीसी कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही या पद्धतीचे बोर्ड गावागावात वार्डा -वार्डात प्रत्येक चौफुलीवर, ओबीसी बांधवांनी लावावे आणि त्याकरता सभागृहाने त्याला मान्यता दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंदना वनकर, संजय सोनटक्के, सुरेश वंजारी डीपी वंजारी, उमेशचंद्र चिटकुले, रामदास माहुरे, देविदास आगरकर, अशोक सांबारे, एचडी भडके, पुरुषोत्तम कांमडी, अशोक काकडे, विश्वघोष सोमकुवर, डॉ.अनिल कुमार नागबोध, नंदू नागरकर, चंद्रपूर सतीश मालेकर चंद्रपूर, विठ्ठल गजभिये, महेश गिरी, मोहन डोंगरे, वत्सल देशमुख, महेश वैरागडे , संदीप बुटले, सत्यशोधक प्रबोधनकार, अरविंद माळी, सुधाताई बामपल्लीवार, नागपूर शुभांगी घाटोळे, कमल खंडारे, माधवी पंचबुद्धे, नथू रोकडे, आकाश वैद्य, प्रा. सतीश आढाव, अर्चना बर्डे, एड. सुषमा भड, किशोर थोटे, संजय वर्हेकर, अमरावती, जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष शेखर सावरबांधे, युवा ज्येष्ठ नेते नितीन कुंभलकर, किशोर चेन्नई संजय रामटेके, डॉ. नितीन भुते, नंदू थोटे हर्षल सातफळे, सुखदेव वंजारी, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण पेटकर, इंजिनिअर संजय नासरे भंडारा, उत्तमराव शेलकर, तालुका सचिव राहुल पडोळे, निलेश गुल्हाने, संजय रामटेके, सुरेश वडतकर, अनिल संभाजी जिपकाटे, यवतमाळ प्रफुल गुल्हाने, ज्ञानेश्वर रायमल, किशोर सुरकर, किशन कांबळे, विजय हटवार, भास्कर बेलसरे, महादेवराव खरे, डॉ. नितीन बुटले, डॉ. अशोक भांगडकर, बाबा बिडकर, अनुज हुलके अरुण गाडे, रवी पटोले, अरुण गाडे, कमलेश वासेकर, चित्रा जुमडे, सुशील झुंबडे, अमोल नंदुरकर, विनोद लांबाडे, माजी नगरसेवक चंद्रपूर आधी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात सदर चिंतन शिबिर यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. विलास काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना वनकर यांनी केले 13 जण जे ओबीसी आंदोलना करिता शहीद झाले त्यांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जय ओबीसी म्हणत.




