spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रा. पं. चाचेर येथे महिला मुक्ती दिन ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती साजरी 

किशोर साहू, मौदा,ता,४ :- आज शनिवार दि.(3 जानेवारी) ला ग्रा पं कार्यालय चाचेर येथे महिला मुक्ती दिन , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या फोटो चे पूजन सरपंचा लुंबीनी महेश कलारे, उपसरपंच रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. यावेळी ग्रा प सदस्य सुरेंद्र टेंभरे शैलेश कोपरकार ,कृषिसहायक गणेश खडूल,कृषी सहायक पायल झलके ,नितीन नागमोते,उमेश झलके, भारती सोनवाने,अर्चना सुरकर, शालु हूळ,रिना येरपुडे, राधा कोपरकार ,ग्रा पं लिपिक चंद्रशेखर देवगडे,रामानंद खडसे,उत्तम पाटील,आकाश राऊत, अमरदीप अडकणे, रोजगारसेवक हुमने उपस्थित होते.

Popular Articles