spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भालेराव महाविद्यालयात विश्व निसर्ग संवर्धन दिन

सावनेर :- मागील तीन दशकापासून दरवर्षी २८ जुलै हा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. या प्रसंगाचे औचित्य साधून स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास डोईफोडे तर प्राचार्य डॉ. सुनील डोंगरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. भारतीय संस्कृतीत आपण अनेक सण साजरे करतो यात आपण अप्रत्यक्षपणे निसर्गाचीही पूजा करतो, तसेच प्रत्येकाने निसर्ग संवर्धन कृतीतून व्यक्त करावे असे प्रतिपादन डॉ. डोंगरे यांनी केले. रीना लंगडे, पलक मानकर आणि समीक्षा ठाकरे या विद्यार्थ्यांनी प्रासंगिक मनोगत व्यक्त केले.

निसर्ग संवर्धन दिनाचा इतिहास, मानवी जीवनात निसर्ग, पर्यावरणाचे महत्व आणि रोजच्या कृतीतून निसर्गाचे संवर्धन या विषयी सविस्तर विवेचन प्रा. विलास डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. चंद्रशेखर पोटोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रवीण दुलारे, प्रा. समीक्षा भोले, विलास सोहागपुरे आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि कृतीतून निसर्ग संवर्धनाची इच्छा प्रकट केली. निसर्ग संवर्धन या विषयावरील कविता वाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.