कन्हान :- अंधत्वावर मात करित पाल्कची सामुद्रधुनी पोहुन विश्वविक्रमाचा ठसा रोवुन भारताची मान जगात उंचावणारी ईश्वरी पांडे हिचा योग सखी बहुउद्देशीय संस्थे व्दारे सत्कार करण्यात आला.
अंधत्वावर मात करून पाल्कची सामुद्रधुनी पोहुन विश्वविक्रमाचा ठसा रोवुन भारताची मान जगात उंचावणारी ईश्वरी करुणा कमलेश पांडे हिचा सत्कार योग सखी बहुउद्देशीय संस्थेव्दारे पुष्पगुच्छ व भारताचे संविधान देऊन करण्यात आला. वयाच्या सहाव्या वर्षी अंधत्वाचा विचार न करता पोहायला शिकली. प्रेरणा होती ७ मुलांचा नदीच्या पात्रात बुडुन झालेला मृत्यु. तेव्हा पासुन ईश्वरीने आपण पोहायला शिकुच ही जिद्द मनात बाळगली. माझ्या ह्या जिद्दीत माझं अंधत्व कधीच आड येऊ देणार नाही. अंधत्व माझी कधीच कमजोरी राहणार नाही. ती दहावीत ८४% गुण घेऊन विदर्भात अंध विद्यार्थ्यांलमधुन पहिली मेरिट आली होती. तिला संगिताचीही आवड आहे. ती संगिताच्या पाच परीक्षा पास झाली. हार्मोनियमच्या दोन परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाली. पुढे आंतरराष्ट्रीय धावपटु होण्याचं तिचं स्वप्न आहे. संस्थे कडुन ईश्वरीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन डोळस असणाऱ्यांसाठी ईश्वरी प्रेरणा आहे. याप्रसंगी संस्थेच्या सचिव छाया कुरुटकर, उपाध्यक्ष मेघा फेंडर, कोषाध्यक्ष मनिषा बोरकर, प्रियंका साठवणे, माधुरी लाडेकर, वनिता बिरमवार, लता खांबलकर, कोकिळा सेलोकर, शिल्पा खाइवले, वैशाली नंदनवार, अद्विका सेलोकर सह पदा धिकारी व सदस्या उपस्थित होत्या.