कन्हान :- पिपरी येथिल प्राचिन कुवारा भिवसेन मंदीरात कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी हयानी कुवरा भीमसेन बाबाचे अभिषेक करून मनोभावे पूजा, अर्चना केली.
पिपरी-कन्हान येथिल पाण्याच्या टाकीजवळ प्राचिन कुवारा भीमसेन बाबाचे मंदिर आहे. या मंदिरात शुक्रवार (दि.१०) एप्रिल २०२६ ला सायंकाळी कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी हयानी कुवरा भीमसेन बाबा चे अभिषेक करून मनोभावे पूजा, अर्चना व आरती करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदा धिकारी इंदल यादव, गणेश खोब्रागडे, राज कपुर साखरे, पिपरी वस्तीचे जेष्ट नागरिक आदी प्रामुख्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. अनिल तडसे, राणीता भलावी, विजय भलावी यांच्या व्दारे महाप्रसा द वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमास समाज बांधव आणि पिपरी वस्तीचे नाग रिक उपस्थित होते.
कुवारा भिवसेन येथे ११ दिवसीय महोत्सव
पारशिवनी तालुक्यातील पेंच धरण तलावाच्या किणा-यावर आणि लगतच्या डोंगरावर आदिवासीचे कुल दैवत कुवारा भिवसेन बाबाचे प्राचिन मंदीर आहे. येथे (दि.२ ते १२ एप्रिल २०२६ पर्यंत ११ दिवस महो त्सव असुन महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील आदिवासी बांधव एकत्र येऊन कुलदैवताची पुजा अर्चना करून कुवारा भिवसेन महोत्सव थाटात साजरा करतात.