भारत निर्माण आंदोलनाच्या विधानसभा संयोजकपदी योगेश धोटे पाटील व संतोष बुजाडे यांची निवड

0
13

– नागपूर दक्षिणची जबाबदारी योगेश धोटे पाटील यांच्यावर; नागपूर पूर्व विधानसभा संयोजकपदी संतोष बुजाडे

नागपूर :- भारत निर्माण आंदोलनाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ देण्यासाठी नागपूर शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये योगेश ज्ञानेश्वर धोटे पाटील यांची नागपूर दक्षिण विधानसभा संयोजक म्हणून, तर संतोष गोविंदराव बुजाडे यांची नागपूर पूर्व विधानसभा संयोजक म्हणून निवड करण्यात आली. ही निवड अविनाश काकडे यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. गौतम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. निवड झालेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करून आगामी काळातील संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली. भारत निर्माण आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या तसेच विविध जनहिताच्या मुद्द्यांना संघटितपणे वाचा फोडण्याच्या दृष्टीने विधानसभा स्तरावर संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या संयोजकांकडून त्यांच्या- त्यांच्या विधानसभा मतदारसंघात संघटनेची बांधणी, कार्यकर्त्यांचे संघटन आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रभावीपणे काम केले जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. योगेश ज्ञानेश्वर धोटे पाटील यांच्यावर नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, संतोष गोविंदराव बुजाडे यांच्याकडे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही नवनियुक्त संयोजकांनी संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमाला आशिष खुबळकर, भारत ठाकरे, कुलवंत सिंग भामरा, तुषार ढोबळे, रोकडे साहेब, चंदू पाटील यांच्यासह भारत निर्माण आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन नियुक्त्यांमुळे नागपूर दक्षिण आणि नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात भारत निर्माण आंदोलनाच्या संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळणार असून, आगामी काळात जनसंपर्क व संघटन विस्ताराला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.