spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या दारू बाळगुण विक्री व सेवन करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध ०६ गुन्हे नोंद

कोंढाळी :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विकी करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू तसेच वाहन असा एकुण ५३,८८०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये एकुण ०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन कोंढाळी अंतर्गत ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन काटोल येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. असे एकुण महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ०६ गुन्हे दाखल केले आहे.

सदर कारवाईत ८७३० मिली देशी दारू तसेच वाहन असा एकुण ५३,८८०/-रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.

Popular Articles