कुही :- पोलीस स्टेशन कुही अंतर्गत फिर्यादी नामे डॉ गणेश ज. मुक्कावार, वय ६० वर्ष रा निर्मल नगरी, शितला माता चौ, नंदनवन उमरेड रोड नागपुर यांनी तक्रार फर्यादी यांची मौजा डवलीमेट (रिटी) खसरा क ४, ५ व ६ असे फिर्यादीच्या परीवाराच्या मालकीची शेती असुन फिर्यादी शेतीची वहीवाट करीत असतात. यातील फिर्यादीस फिर्यादीच्या परिचित नागपुर येथील अर्जविस यांनी फोन करून माहीती दिली की त्यांच्या वॉटअप वर फिर्यादीच्या नमुद शेतीचा विकी करारनामा व आममुखत्यार प्रत्र पाठविलेला आहे त्यामध्ये दुय्यम निबंधक श्रेणी ०१ उमरेड यांचे दस्त क ८६५/२५ दिनांक १८/०२/२५ यातील आरोपी के १ स्नेहल जगदिश विटनकर, वय ३८ वर्ष, रा प्लॉट नं ८८. पुनापुर रोड भवानी नगर, पारडी. नागपुर याने फिर्यादी व त्याचे परीवारातील सदस्यांचे खोटे कागद पत्र तयार करून खोट्या सहया मारून फिर्यादी व फिर्यादी परीवाराची फसवणुक केली अशा फिर्यादीच्या तोडी रिपोर्ट पोलीस स्टेशन कुही येथे कलम ३१८(४),३३६ (२), ३३६ (३) भारतीय न्याय संहिता अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे.
नमुद गुन्हयाच्या तपासात कुही पोलीसांनी आरोपी स्नेहल जगदिश विटनकर याला दिनांक ०६/१०/२०२५ रोजी अटक केली होती. सदर गुन्हयाच्या तपासात असे निदर्शनास आले की, आरोपी कं १ स्नेहल जगदिश विटनकर याने फिर्यादीच्या नमुद शेतीचा विकी करारनामा व आममुखत्यार प्रत्र हे खोट दस्ताऐवज आरोपी के २) नामे सूरज अरविंद ठाकरे, वय ४३ वर्ष, रा. चंद्रपूर याचे सांगण्यावरून तयार केले आहे तसेच त्यांचे बँक खाते तपासले असता आरोपी कं १ आणि २ मध्ये पैशाचा व्यवहार सुध्दा झालेला आहे. परंतु नमुद आरोपी के २ हा मिळुन येत नव्हता. सदर गुन्हयाचा तपास कुही पोलीस करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी सुध्दा समांतर तपास सुरू केला. मा. श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना दिनांक ०३/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नमुद गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हा नागपूर शहर येथून बुटीबोरी मार्गे चंद्रपूर ला जाणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यावरून पोलीसांनी बोरखेडी टोल, प्लाझा येथे सापळा रचुन आरोपी नामे सूरज अरविंद ठाकरे, वय ४३ वर्ष, रा. चंद्रपूर याला ताब्यात घेतले. नमुद आरोपीला कुही पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन अटकेची प्रकीया सुरू आहे.








